breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांचा अधिका-यांवर संताप

  • ब प्रभाग समितीच्या बैठकीला अधिका-यांनी मारली दांडी
  • नागरिकांच्या प्रश्नांवरून प्रशासनाला घेतले फैलावर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रभागात कचरा वेळेवर उचलला जात नाही, साफसफाई कर्मचारी उद्धटपणे बोलतात, पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, डेंग्यूची साथ फैलावत असताना औषध फवारणी होत नाही, यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अधिकारीच बैठकीला उपस्थित राहत नसतील, तर आम्ही नागरिकांचे प्रश्न कोणासमोर मांडायचे, असा सवाल करत विधी समितीच्या सभापती माधुरी कुलकर्णी यांनी ब क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांच्यावर संताप व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग समितीची बैठक आज बुधवारी (दि. 5) पार पडली. या बैठकीला प्रभाग समिती अध्यक्षा करूणा चिंचवडे, नगरसेविका नीता पाडाळे, उषा काळे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर आदी नगरसेवक उपस्थित होते. मात्र, बहुतांश अधिका-यांनी बैठकीला दांडी मारली.

ब क्षेत्रीय कार्यालयातील समितीच्या बैठकीत अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे नगरसेवकांनी मांडलेले नागरिकांचे प्रश्न गेली कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. पाणी पुरवठा, कचरा, रस्ते, उद्यान-शाळा-दवाखाने यांची दुरवस्था झाल्याचे प्रश्न नागरिक नगरसेवकांपुढे मांडत आहेत. हे प्रश्न या बैठकीत उपस्थित केले जाणार होते. अधिकारी उपस्थित नसल्यामुळे विधीच्या सभापती कुलकर्णी यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. ज्या दिवशी बैठक आहे, त्या दिवशी अधिकारी मुद्दामहून उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अधिकारी खोत यांचा प्रशासनावर कंट्रोल नसल्याचे दिसते. पुढच्या बैठकीत अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, तर प्रशासनाचा जाहीर निषेध केला जाईल, असा इशारा कुलकर्णी यांनी अधिका-यांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button