breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अतिरिक्त आयु्क्त प्रवीण आष्टीकरांकडील पदभार काढा

नगरसेवक राजू मिसाळ यांची स्थायीच्या बैठकीत मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे अनेक विभागाचा पदभार आहे. त्यामुळे अनेक कामांच्या फाईल वारंवार पडून राहत आहेत. अनेक विभाग एकाच व्यक्तीकडे असल्याने कामाचा व्याप वाढला आहे. तसेच काही अधिकारी पालिकेत रात्री उशिरापर्यंत थांबून राहत आहेत. त्यांना राष्ट्रीय कार्यक्रम केल्याशिवाय कोणतीही फाईल पुढे जात नाही. यामुळे सर्व वरिष्ठ अधिका-याच्या केबीन, अॅन्टी चेंबरला सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हाईस रेकाॅंर्डिंग बसवावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्य राजू मिसाळ यांनी केली आहे. 

महापालिका स्थायी समितीची आज (बुधवारी) सभेच्या अध्यक्षास्थानी ममता गायकवाड होत्या. यावेळी राजू मिसाळ म्हणाले की,  महापालिका कार्यालयात अनेक वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात ठाण मांडून बसलेले असतात.  महापालिकेतील महत्वांच्या विभागाचा पदभार अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे आयुक्तांनी दिला आहे. एकाच माणसाकडे अनेक विभागाचा पदभार असल्याने त्यांना कामकाज करणे अवघड होवू लागले आहे. काही विभागातील महत्वांच्या फाईल टेबलावरुन पुढे जातच नाहीत. प्रत्येक कामांशी संबंधित अधिका-यांकडून राष्ट्रीय कार्यक्रम झाल्याशिवाय ती फाईल पुढे जात नसल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या केबीन आणि अॅन्टी चेंबरमध्ये व्हाईस रेकॉर्डिंग व ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर सलग दुस-या स्थायी समितीच्या सभेला अनुउपस्थित होते. त्यावरुन देखील मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button