Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अतिक्रमण कारवाई विरोधात महापालिकेवर उद्या मोर्चा

पिंपरी- पिंपरीतील संत तुकारामनगर, महेशनगरमधील टप-यांवर महापालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात अधिकृत परवानाधारक टपरी, हातगाडी धारकांवर देखील कारवाई झाली.  त्याच्या निषेधार्थ टपरी, हातगाडी पंचायतीच्या वतीने व्यवसायिकाचा सोमवारी (दि.७) बंद पुकारण्यात आला आहे.
महापालिका प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून टपरी, हातगाडी धारकांवर कारवाई करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यासाठी पंचायतीच्या वतीने सोमवारी व्यवसाय बंद ठेऊन सकाळी अकरा वाजता संत तुकारामनगर ते महापालिका असा मोर्चा काढण्यात येणार आहे. अतिक्रमण कारवाई ताबडतोड थांबविण्यात यावी. सर्वाना परवाना दिला जावा. बोगस लाभार्थीवर कारवाई करावी. गोरगरीब प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या पक्के गाळे बांधून दयावेत. हॉकर्स झोनची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी त्यांची आहे.
पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी प्रल्हाद कांबळे शहर अध्यक्ष रमेश शिंदे, धर्मराज जगताप, बळीराम काकडे, माऊली शिंदे, पवन परदेशी, संतोष परदेशी, प्रकाश बाळ, नियाज देसाई , हेमंत मोरे ,  विजय शिंदे  आदी उपस्थित राहणार आहेत
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button