breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णाभाऊ साठे नगर ते मानकर चौक येथील बंदिस्ती नाल्याचा मार्ग मोकळा

पिंपरी, (महा ई न्यूज) – गेल्या कित्येक दिवसांपासून प्रस्तावित नाल्याचे काम मार्गी लागत नसल्यामुळे अणाभाऊ साठे नगर, मानकर वस्ती, कस्पटे वस्ती या भागातील नागरिकांना दुगर्धींचा सामना करावा लागला. मात्र, प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपच्या नगरसेविका ममता गायकवाड या स्थायी समितीच्या सभापती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नाल्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. सभापती गायकवाड यांच्या हस्ते कस्पटे वस्ती येथील या बंदिस्त नाल्याच्या कामाचे नुकतेच भूमीपूजन झाले आहे.

हा भूमीपूजन सोहळा शनिवारी (दि. २९) वाकड येथील अण्णाभाऊ साठे नगर ते मानकर चौक येथील नाल्याचे बंदिस्तीकरणचे भूमिपूजन समारंभात स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, सर्व सोसायटीचे पदाधिकारी, ज्येष्ट नागरिक आदी उपस्थित होते.

या नाल्यामुळे गेली अनेक वर्षे आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आदी त्रास सहन करावा लागला. या उघड्या नाल्यामुळे येथील नागरिकांना सर्व सुयीसुविधा असूनदेखील बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे त्यात अनेकांना डेंगू, मलेरिया यासारख्या गंभीर आजाराला देखील समोरे जावे लागले. येथील नागरिक, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत त्रस्त सहन करावा लागला. याबाबत सर्व नागरिकांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड व मा. नगरसेवक विनायक गायकवाड यांच्याकडे लवकरात लवकर बंदिस्त नाल्याचे काम मार्गी लावण्याची मागणी केली होती.

त्यावर महापालिकेच्या १८ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत अध्यक्षा ममता गायकवाड यांनी या नाल्याच्या १ कोटी ३९ लाख ८४ हजार रकमेस मंजुरी देत हे काम लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले होते. त्यानुसार शनिवारी या कामाचे सर्वांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप काही कामानिमित्त परदेशात असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थिती लावता आली नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button