breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इसमात अंत्यसंस्कार ; मानसकन्येनं दिला मंत्राग्नी

नवी दिल्ली –  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. कवी, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी असे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू असलेल्या वाजपेयींच्या निधनानं संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला.

राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, लालकृष्ण आडवाणी, अमित शहा आणि तिन्ही सेनादल प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच, त्यांना 300 जवानांनी अखेरची मानवंदना दिली. यावेळी अनेक पक्षांचे नेते, भाजप कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर देशभरात सात दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button