breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अजित पवाराचं बेरजेचं राजकारण फसलं कुठं?; मोदीच्या चमत्कारावर बारणेंची लाॅटरी

  • नरेंद्र मोदीच्या करिष्मामुळे श्रीरंग बारणेंनी मारली बाजी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – देशात नरेंद्र मोदीच्या त्सुनामीमुळे दिग्गज उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.  मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेरजेचं गणित चुकलं कुठं?, त्याचा फटका निवडणुकीत पार्थ पवारांना बसला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बालेकिल्ला अबाधित ठेवत पार्थ पवारांवर मोठ्या मताधिक्यानी पराभव केला. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक होती. या मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार तर वंचित बहुजन आघाडीकडून राजाराम पाटील यांच्यात तिहेरी लढतीत शिवसेनेचे बारणेंनी बाजी मारली आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीत महाआघाडीची भिस्त शेकापवर होती. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवाराच्या पराभवाने पवार कुटूंबियाला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे देशात ‘जायंट किलर’ ठरले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची कर्मभूमी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांनी नाकारले की राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मतदारांच्या घरोघरी न पोहोचल्याने पराभव पत्करावा लागला, हे शोधावे लागणार आहे.

तसेच मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांना पहिल्या सभेपासून नेटक-यांनी केलेले ट्रोल, शेतक-यांवरील झालेला गोळीबाराचा मुद्दा, पवार कुटुंबियामुळे स्थानिक राजकारणांना मक्तेदारी मोडीत निघेल याची भिती, पिंपरी-चिंचवडच्या मतदारांना आपलंस करण्यात आलेले अपयश, मोठ्या मताधिक्यासाठी शेकापवर अवलंबून राहिल्याची चूक यासह विविध कारणांनी पार्थ पवारांना पराभव स्विकारावा लागला आहे.

पनवेल, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघात मतदारांनी पुन्हा एकदा पवार कुटूंबियाला नाकारचे दिसत आहे.

शिवसेना – श्रीरंग बारणे

पनवेल – 160355

कर्जत – 83996

उरण – 89587

मावळ – 105272

चिंचवड – 176475

पिंपरी – 103235

पोस्टल – 1713

एकूण – 720663

राष्ट्रवादी – पार्थ पवार

पनवेल – 105727

कर्जत – 85846

उरण – 86699

मावळ – 83445

चिंचवड – 79717

पिंपरी – 61941

पोस्टल – १३७५

एकूण – 504750

पार्थ पवार यांचा 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button