breaking-newsमनोरंजन

अजय बदलणार “तानाजी’चे शीर्षक ?

शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये स्वकर्तृत्वाच्या बळावर काही मावळ्यांनी आपले नाव अजरामर केले. त्यापैकीच एक नाव म्हणजे तानाजी मालुसरे हे आहे. अभिनेता अजय देवगण चित्रपटाच्या रुपात तानाजींच्या पराक्रमाच्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या चित्रपटाचे नाव “तानाजी : द अनसंग वॉरियर’ असे असून अजय सध्या त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय या चित्रपटाचे “तानाजी’ हे नाव बदलून “तान्हाजी’ असे ठेवणार असल्याचे वृत्त आहे.

आजवर बऱ्याच चित्रपटांची नावे विविध कारणांमुळे बदलण्यात आली. पण अजयच्या या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यामागे ज्योतीषीचे कारण सांगितले जात आहे. अजयने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नसून या गोष्टीला चित्रपट पटकथालेखनाच्या टीमने दुजोरा दिला आहे.

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. अजय यामध्ये तानाजींची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर सलमान खान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ओम राऊत दिग्दर्शित “तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button