breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अच्छे दिन आलेच नाहीत – नारायण राणे

चिपी विमानतळ हे माझे अपत्य आहे, त्यामुळे मी खो घालण्याचा प्रश्नच नाही. चिपी विमानतळाचे श्रेय नारायण राणेला मिळेल म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पोटात दुखत आहे अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी केली. राणे हे नाव सत्तेतून बाजूला गेल्या नंतर काय होते हे मागील चार वर्षांत जनतेने अनुभवले आहे. त्यामुळे जनतेने आता तरी विचार करावा असे भावनिक आवाहन  नारायण राणे यांनी केले.

पाचही राजकीय पक्षांनी जाहीरनामे- वचननामे दिले पण अच्छे दिन आले नाहीत, एक कोटी नोकर्या लागल्या नाहीत , महागाई कमी झाली  नाही त्यामुळे यापुढे महाराष्ट्र स्वाभिमान  पक्ष जनतेच्या कल्याणासाठी असेल असे राणे म्हणाले .भाजपा -शिवसेनेवर टिका केली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद  नोंदणी शुभारंभ प्रसंगी येथील रवींद्र मंगल कार्यालयात नारायण राणे बोलत होते .यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब ,महिला अध्यक्षा प्रणिता पाताडे ,संदीप कुडतरकर, शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर ,प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर ,गीता परब, अन्वर खान आधी उपस्थित होते.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सभासद नोंदणी करून पुढील निवडणुकात खासदार व आमदार स्वाभिमान पक्षाचे असतील असे करून दाखवा असे आव्हान नारायण राणे यांनी करून सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी एक लाख सभासद  नोंदणी करावी आणि त्यांनी पाहिजे ते मिळवावे असे आवाहन राणे यांनी केले .एक लाख पक्ष नोंदणी केली तर पालकमंत्री  दीपक केसरकरांना बाडबिस्तारा गुंडाळून गोव्याला जावे लागेल , हे ध्यानात घ्यावे असे आवाहन देखील केले .केसरकर पाच वष्रे कुचकामी ठरले असल्याने जनतेने त्यांचे डिप्झिट जप्त करावे असे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पुढील काळात काम करावे असे आवाहन राणे यांनी केले .राज्यात पाच राजकीय पक्ष आहेत ते निवडणूकात जाहीरनामे -वचननामे देतात पण त्याची पूर्तता करत नाहीत त्यामुळे अच्छे दिन आले नाहीत ,एक कोटी नोकऱ्याही लागल्या नाहीत, पेट्रोल डिझेल कमी झालं  नाही किंवा पंधरा लाख बँक अकाऊंटमध्ये जमा देखील झालेली नाहीत, हे ध्यानात घेऊन स्वाभिमान पक्ष यापेक्षा वेगळा आहे हे जनतेला दाखवून द्या आणि पुढील निवडणुकात विजय मिळवा असे राणे यांनी आव्हान केले.

खासदार विनायक राऊत ,पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक हे निष्क्रिय आहेत अशा कुचकामी लोकांना घरी पाठवा आणि स्वाभिमानाचा बाणा दाखवा असे आव्हान राणे यांनी केले शिवसेना ,भाजप ,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षावर त्यांनी टीका देखील केली.

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात विकासात आघाडीवर जाण्यासाठी मी कष्ट घेतले त्यामुळे प्रगतशील व विकसनशील जिल्हा म्हणून राज्यात स्पध्रेत होता. परंतु मागील चार वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी हा जिल्हा विकासात दहा वष्रे मागे नेला असा आरोप राणे यांनी केला.

जिल्ह्यात महामार्गाची दैनावस्था  आणि ग्रामीण भागातील रस्त्यावरचे खड्डे पाहता पालकमंत्री कुचकामी ठरलेले आहेत .गेले सात महिने जिल्हा नियोजन मंडळाची बठक आयोजित केलेली नाही ते पालकमंत्री कुठे आहेत असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित करून जिल्ह्यातील शेतकरी ,मच्छिमार, व्यावसायिक ,उद्योजक अशा सर्व  प्रश्नांकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केलेला आहे आरोग्य यंत्रणा कोमात, रेशनवर धान्य देखील नाही असे नारायण राणे म्हणाले. खासदाराने  जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केलेले नाही त्यांला हिंदी व इंग्रजी शुद्ध भाषेत बोलता येत नाही ते काय संसदेत भूमिका मांडणार असा आरोप देखील नारायण राणे यांनी केला .पालकमंत्री केसरकर यांची विधिमंडळात चेष्टा केली जाते ते विकास काय साधणार ?असे राणे यांनी सांगून पालकमंत्री केसरकर, खासदार राऊत व आमदार नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले.

चिपी विमानतळ ,सी वर्ल्ड ,रेडी बंदर, आयटी प्रकल्प असे अनेक प्रकल्प मी आणण्याचा प्रयत्न केला परंतु शिवसेनेने खो घातला असा आरोप राणे यांनी केला शिवसेना विकासासाठी नव्हे तर विकास प्रकल्प बंद करण्यासाठीच आहे अशी टीका त्यांनी करून आडाळी एमआयडीसीत पन्नास ते सत्तर  हजार तरुणांना रोजगार मिळणार होता परंतु पालकमंत्र्यांनी त्याकडे पाहिले नाही स्वाभिमान पक्ष प्रकल्प बंद करण्यासाठी नव्हे तर सुरू करण्यासाठी आहे असे शिवसेनेवर आरोप करत राणे म्हणाले .

चिपी विमानतळ मंजुर केला.त्यासाठी ठेकेदार नेमला आणि जमीन मालकांचा विरोध सोसला त्यावेळी सन २०१४ मध्ये हे विमानतळ पूर्ण झाले. चिपी विमानतळ हे माझे अपत्य आहे, मग मी खो कशासाठी घालणार ?असा  नारायण राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या टीकेचा समाचार घेताना उपस्थित केला. उलट हवाई मंत्री सुरेश प्रभू यांनी १२ सप्टेंबर रोजीच्या विमान उड्डाणाचा शुभारंभाचा निरोप मला दिला.त्यांनी केसरकर यांचे नाव टाळले. केसरकर फक्त नारायण राणे  याला विमानतळाचे श्रेय मिळू नये म्हणून प्रयत्न करत  असून त्यासाठी त्यांच्या पोटात दुखत असल्याचा आरोप राणे यांनी केला .

मी हॉस्पिटलचा प्रकल्प उभारला त्यावेळी केसरकर यांनी मल्टी स्पेशालिटी  हॉस्पिटलची घोषणा केली पण हा प्रकल्प आता कुठे आहे? हे तुम्ही शोधा असे आव्हान त्यांनी उपस्थिताना केले. केसरकर यांच्या घोषणेचा समाचार जनतेने घ्यायला हवा ,उलट प्रकल्प नाही नोकर्या नाहीत म्हणून जाब विचाराला पाहिजेत असे आव्हानदेखील राणे यांनी केले .मल्टी स्पेशालिटी  हॉस्पिटलसाठी बजेटच्या पुस्तकात वीस कोटीची तरतूद केलेली नसताना भाषणात मात्र ते कुठून आले असा प्रश्न उपस्थित करून केसरकर जनतेला फसवत आहेत असे राणे यांनी आरोप केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button