breaking-newsपुणे

अंनिसकडून ‘जवाब दो’ आंदोलन अधिक तीव्र करणार – मिलिंद देशमुख

पिंपरी –  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनाला २० ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला देखील साडेतीन वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटक शासनाने गौरी लंकेश खून तपासात मोठ्या प्रमाणात प्रगती केली असताना महाराष्ट्र शासन आणि सीबीआय मात्र तपासात फारशी प्रगती करू शकलेले नाही. शासनाकडून या दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलीस दलाचे हसे होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अनिस ‘जवाब दो’ आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा आज अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिला आहे.  

पुणे नागपूर औरंगाबादसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांच्या सोबत प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. पुणे येथील २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेते प्रकाश राज, अमोल पालेकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉक्टर दाभोलकरांच्या अम आणि निरास या पुस्तकचे हिंदी अनुवादाचे लोकार्पण केले जाईल. राष्ट्र सेवादल इचलकरंजी यांचे स्मिता पाटील कला पथक या कार्यक्रमात गांधचे काय करायचे हे नाटक सदर करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button