breaking-newsमुंबई

अंधेरीत रेल्वे पादचारी पुलाचा भाग कोसळला

मुबंई – अंधेरी रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा भाग आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर पडल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेत दोन पादचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातामुळे अंधेरी ते बोरिवलीपर्यंत लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी रेल्वे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून कोसळेला भाग रेल्वे रुळांवरुन काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button