breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंदाजपत्रकात तरतुदी केलेल्या सुमारे तिनशे कोटींच्या वर्गवारीला मान्यता

पिंपरी – महापालिकेच्या 2018-19 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी तरतुद केलेले कोट्यावधी रुपये अन्य विकास कामे करण्यास वर्ग करण्यात येणार आहेत. त्याकरिता महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत यांत्रिकी विभागातील विविध विकासकामे करण्यास सुमारे तिनशे कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत आयत्यावेळी मान्यता दिली. तसेच हे प्रस्ताव उद्या (बुधवारी) होणा-या महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन 2018-19 या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य शासनाचे विविध प्रकल्पासह सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या अंदाजपत्रकात शहरातील प्रस्तावित वेगवेगळ्या विकास कामांना तरतुदी करण्यात आल्या. तसेच अंदाजपत्रकाला मान्यता देवून तब्बल चार महिने उलटले आहेत. मात्र, अंदाजपत्रकात तरतुदी केलेल्या रक्कमाची वर्गवारी केली जात आहे.

महापालिकेच्या ह, क, ई, अ आणि फ प्रभागातील स्थापत्य, विद्युत यांत्रिक विभागातील कामे करण्यासाठी तब्बल आठ विषय आयत्यावेळी आणून मंजूर केले आहेत. यामध्ये स्थापत्य विभागातील ह प्रभागात 9 कोटी 5 लाख, क प्रभागात 16 कोटी, ई प्रभागात 10 कोटी 50 लाख, अ आणि फ प्रभागात 211 कोटी 56 लाख, ईडब्लूएसची 7 कोटी, विद्युत यांत्रिकीची 4 कोटी 50 लाख, 8 कोटी तसेच स्थापत्य व विद्युत यांत्रिकी विभागाची 33 कोटी 46 लाख अशी तब्बल 298 कोटी रुपयांचे वर्गवारीचे प्रस्तावाला स्थायी मान्यता दिली. हे सर्व प्रस्ताव वन-के अंतर्गत महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवले आहे.  दरम्यान, महापालिकेच्या विविध योजना, विकास कामांसाठी अंदाजपत्रकात तरतुद केलेला रक्कमा खर्च न केल्यामुळे कोट्यावधी निधी वर्ग करण्याची वेळ आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button