breaking-newsआंतरराष्टीय

अंदमानातील ‘त्या’ बेटावर ख्रिश्चन धर्मप्रचारासाठी गेला होता अमेरिकी पर्यटक

अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटिनेल बेटावरील सेंटिनेल आदिवासी टोळीच्या हल्ल्यात जीव गमावणारा अमेरिकी पर्यटक जॉन अ‍ॅलेन चाऊ हा ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी त्या बेटावर गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. ‘माझी हत्या झाल्यास त्या आदिवाश्यांना माफ करा’, असेही त्याने कुटुंबीयांना सांगितले होते.

जॉन चाऊ हा पर्यटक अंदमान निकोबर येथे यापूर्वी पाच वेळा येऊन गेला होता. त्याची सेंटिनेल या अस्तंगत होत असलेल्या आदिवासी जमातीला भेटण्याची इच्छा होती. या बेटावरील आदिवासी समाजात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याच्याकडील नोंदवहीतूनच हा खुलासा झाला आहे.

आदिवासी टोळीच्या हल्ल्यातून एकदा बचावला होता
जॉन चाऊला त्या बेटावर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा होता. जॉन चाऊने तीन वर्षांपासून या बेटावर जाण्याची तयारी केली होती. जॉनने १४ नोव्हेंबरलाही तेथे जाण्याचा प्रयत्न केला होता. तो बेटाच्या जवळ पोहोचला. बेटावरील आदिवासी समाजातील काही लोकांशी त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जॉनला पाहताच बेटावरील काही जण सांतपले. यात एका लहान मुलाचाही समावेश होता. त्यांनी जॉनच्या दिशेने बाणही मारला. सुदैवाने तो बाण जॉनच्या हातात असलेल्या एका ग्रंथाला लागला. जॉनने त्याच्या नोंदवहीत हातात असलेल्या ‘बायबल’मुळे माझे प्राण वाचले, असा उल्लेख केला आहे.

१५ नोव्हेंबरला पुन्हा बेटावर
जॉन चाऊने १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बेटावर जाण्याचा प्रयत्न केला आणि इथेच त्याचा घात झाला. तो बेटाजवळ पोहोचताच आदिवासी टोळीने त्याच्यावर हल्ला केला आणि यात त्याचा मृत्यू झाला. काही मच्छिमारांनी त्याचा मृतदेह तरंगताना पाहिला आणि याची माहिती पोलिसांना दिली.

त्यांनी मला स्वीकारले नाही याचे दु:ख
१४ नोव्हेंबर रोजीच्या घटनेचा जॉनने नोंदवहीतही उल्लेख केला आहे. ‘त्यांनी माझ्या दिशेने बाण मारले आणि मी घाबरलो. मी प्रत्युत्तरात त्यांच्या दिशेने एक मासा फेकला आणि माघारी परतलो. मी मच्छिमारांना नियोजित स्थळी बोट घेऊन थांबण्याची सूचना केली होती. तिथून परत येताना मला वाईट वाटत होते. मनात दु:खाची भावना होती. त्यांनी मला स्वीकारले नाही आणि यामुळेच मी हताश झालोय’, असे त्याने म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button