breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंडर वल्ड डॉन अरुण गवळीच्या मावळातील ‘हस्तका’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे केली जप्त
  • गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाची कामगिरी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – अंडर वल्ड डॉन अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीस पथकाने काल अटक केली. तो भोसरीत बेकायदेशीर पिस्तुल विक्री करण्यासाठी आला होता. त्याच्या अन्य दोन साथिदाराला सुध्दा पोलिसांनी अटक केली आहे. एकूण दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत.

चरण बाळासाहेब ठाकर (वय 26, रा. दारुब्रे, कारखाना रोड, ता. मावळ, जि. पुणे, प्रदीप शिवाजी खांडगे (वय 28, रा. मु. पो. पांगरी, ता. खेड, जि. पुणे) आणि राजू शिवलाल परदेशी (वय 59, रा. दत्तवाडी, कुसगाव ब्रुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील आळंदी रोडवरील भोसरी येथे चरण ठाकर देशी पनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला माळाली होती. पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचा-यांनी त्याठिकाणी सापळा लावून ठाकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्टल आणि काडतुस ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता हे पिस्टल प्रदीप खांडगे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.

त्यावर पोलिसांनी खांडगे याला देखील अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने मध्य प्रदेशमधून दोन पिस्टल आणून एक पिस्टल चरणला आणि दुसरे राजू परदेशी याला विकल्याचे सांगितले. त्यावर दोन्ही पिस्टल पोलिसांनी ताब्यात घेतले. सोबत पाच जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत. चरण ठाकर याने अंडर वल्ड डॉन अरूण गवळी याच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष पद भूषविले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button