breaking-newsमहाराष्ट्र

अंगापुरात वायरमनला मारहाण

सातारा:- थकीत बिलामुळे वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यासाठी गेलेल्या वायरमनला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजेंद्र जगन्नाथ शेडगे याच्याविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सागर सुधारकर आडे हे महावितरणच्या अंगापुर विभागात वायरमन आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंगापुर येथे जगन्नाथ ज्ञानु शेडगे यांच्या घराचे वीजबील थकीत होते. त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी बील भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्या घराचे वीज कनेक्‍शन तात्पुरते बंद करण्यासाठी शेडगे गेले होते. वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या शेडगे यांना जगन्नाथ यांचा मुलगा राजेंद्र याने धक्काबुक्की केली. या धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजेंद्र जगन्नाथ शेडगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button