breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडीत भर रस्त्यात महिलेच्या डोक्यावर पिस्तूल रोखले

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आपल्या मुलाला घेऊन चहा पिण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला रस्त्यात अडवून तिच्या डोक्यावर पिस्तूल रोखून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार 25 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हिंजवडीत घडला. यातील आरोपी फरार असून याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिखर शरद सिंग (वय 30, रा. एक्झरबिया, हिंजवडी टाऊन, मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 33 वर्षाच्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या मुलाला घेऊन 25 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चहा पिण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या शिखर सिंगने महिलेला भर रस्त्यात अडविले. त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून ‘तु माझ्याविरोधात पोलिसांत दाखल केलेल्या केसेस मागे घे’, नाही तर ‘तुला खल्लास करेन’, अशी धमकी दिली. त्यानंतर शिखर सिंग ज्या मुलीसोबत दुचाकीवर त्याठिकाणी आला होता, त्याच मुलीच्या दुचाकीवर पाठीमागे बसून फरार झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button