ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूर लोकसभेवर ‘आरपीआय’चा दावा; राजा सरवदेच्या उमेदवारी रामदास आठवलेकडून घोषणा

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या जागेसह राज्यातील एकूण तीन जागांवर रिपब्लिकन पक्षाचा दावा असल्याचे सांगत सोलापूरमधून आरपीआयची उमेदवारी राजा सरवदे यांना देणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.

सोलापुरात नॉर्थ कोर्ट मैदान येथे आरपीआय सोलापूर जिल्ह्याचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेने मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने सोलापुरात जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. या महामेळाव्यास रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले तसेच पुत्र जित आठवले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राजा सरवदे उपस्थित होते.

मेळावा यशस्वी ठरल्याने राज्य सरचिटणीस आणि महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे यांचे कौतुक आठवले यांनी केले. आठवले म्हणाले, ‘राजा सरवदे आहे शूर, कारण त्यांचं गाव आहे सोलापूर’ सोलापुरातील जनतेला उजनी धरणाचे पाणी मिळवून देणार, तसेच सोलापुरातील झोपडपट्टीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button