breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूर भाजपमधील गटबाजी उफाळली; देशमुखांचा ‘पवारप्रेमीं’ना इशारा

पंढरपुर – सोलापूर भाजपमधील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील सुप्त संघर्ष व गटा- तटाचे राजकारण पंढरपूरातील बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

पंढरपूर येथे रविवारी (ता. 10) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिका-यांची क्लस्टर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला खासदार शरद बनसोडे, पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्यासह पालकमंत्र्यांचा गट अनुपस्थित होता. त्यातच महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनीही दांडी मारल्याने सोलापूर व माढा या दोन लोकसभा क्लस्टर मतदारसंघाची जबाबदारी असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच संतापले.

दरम्यान, ज्यांना पवारांचा प्रचार करायचा आहे त्यांनी खुशाल करावा, मात्र त्याआधी भाजपमुळे मिळालेली पदे सोडावीत, अशा शब्दांत पालकमंत्री विजय देशमुख आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचे नाव न घेता इशारा सहकारमंत्री देशमुख यांनी दिला. भाजप व राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतलेल्या संजयमामा यांनी सध्या तरी भाजप व राष्ट्रवादीपासून समसमान अंतर ठेवल्याने देशमुखांच्या वक्तव्यानंतर काही राजकीय पडसाद उमटतात का हे पाहावे लागेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button