breaking-newsमनोरंजन

सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपटासाठी एकत्र येणार बीग बी- ऐश्वर्या?

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन मणिरत्नम् यांच्या चित्रपटासाठी एकत्र येणार अशा चर्चा आहेत. ऐश्वर्यानं जवळजवळ या चित्रपटासाठी होकार दिला आहे मात्र बिग बींनी होकार द्यायचा आहे. जर बिग बींचा चित्रपटासाठी होकार असेल तर तब्बल ११ वर्षांनंतर सून आणि सासऱ्यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. हा ‘बाहूबली’नंतर दक्षिणेतला आणखी एक सर्वात मोठा चित्रपट असणार आहे.

हा चित्रपट कल्कि कृष्णमूर्तियांच्या ‘पोंनियिन सेलवन’ कांदबरीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. तामिळ इतिहासातील एका महान राजाची कहाणी या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही विचारण्यात आलं होतं. ऐश्वर्यानं या चित्रपटात प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारावी असा प्रस्ताव मणिरत्नम् यांनी ठेवला आहे. ऐश्वर्याचा जवळजवळ होकार या चित्रपटासाठी आहे तर बिग बींनी मात्र अजूनही होकार दिलेला नाही.

र बिग बींनी होकार दिला तर सून आणि सासऱ्यांची जोडी बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावर दिसेल. याव्यतिरिक्त दक्षिणेतले आणखी मोठे स्टारही या चित्रपटात दिसणार आहे. १४ जानेवारी म्हणजेच ‘पोंगल’च्या दिवशी मणिरत्नम् या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button