breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरकारी कामात अडथळा; महिलांसह एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलांसह एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मंडल अधिकारी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी (वय ५२, रा. क्षितीज सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सविता पठारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन महिला, सुषमा उमेश माळी यांची नातेवाईक अनोळखी महिला, लक्ष्मण नामदेव पवार यांची नातेवाईक वयोवृद्ध महिला आणि इतर तीनजणी, विनोद आत्माराम भोसले, सविता वसंत आहेर, व्यंकटेश्‍वर रेड्डी या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईकवाडी हे मंडल अधिकारी आहेत. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते तहसीलदारांच्या आदेशानुसार हिंजवडी येथील सर्व्हे नं. २६२/३, आनंतानगर, किर्ती क्लासिक येथील मिळकतींचा ताबा घेण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गेले होते. आरोपींनी त्यांना विरोध करत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी वरील बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button