breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सक्षम नागरी वसाहत आणि आर्थिक स्त्रोतात वृध्दी साधणार – महापौर राहूल जाधव

  • आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत दिला संदेश
  •  जगभरातील 76 देशांच्या महापौरांचा सहभाग

पिंपरी – शहरातील उद्योग-व्यवसाय सुलभता आणि जीवनमान उंचावण्यासाठी खात्रीपूर्वक सक्षम नागरिक केंद्रीत शासन तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. 2030 पर्यंत भारतातील नागरी वसाहतीसाठी सर्व सोयींनी सुयोग्य तसेच आर्थिक स्त्रोतातील वृध्दी असे संयुक्तीक शहर बनविण्याचे उद्दीष्ठ आमच्या समोर आहे, असा संदेश महापौर राहूल जाधव यांनी अर्मेनिया येथे भरविलेल्या आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत दिला. या परिषदेला जगभरातील 76 देशातील महापौर उपस्थित होते.

 

येरव्हन, अर्मेनिया येथे आंतरराष्ट्रीय महापौर परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेत जगभारातील 76 देशातील निवडक शहराच्या महापौरांना निमंत्रित केले होते. भारतातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव यांना निमंत्रण आले होते. 4 ते 9 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या परिषदेत महापौर जाधव यांनी शहरातील विकासाचा दर्जा आणि प्रगतीची दिशा उलघडून सांगितली. या परिषदेत रशिया, लंडन, फिलीपाईन्स, चीन, टांझानिया, स्पेन, बेल्जियम, बांग्लादेश, श्रीलंका अशा जवळपास 76 देशातील निवडक शहराचे महापौर उपस्थित होते. त्यावर परिषदेतील घडामोडींची माहिती महापौर जाधव यांनी पत्रकारांना दिली.

 

जाधव म्हणाले की, जगभरातील विविध देशांमधील महापौरांसोबत शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी त्यांनाही निमंत्रीत केले. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वैविध्यपूर्ण प्रकल्पांची माहिती घेतली. येरव्हन, अर्मेनिया येथे राहत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याठिकाणी यांत्रिक पध्दतीने होत असलेली साफसफाई, स्वच्छ पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती घेतली. तेथील नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. विद्यार्थी दशेतच वाहतुकीचे व स्वच्छतेचे नियम शिकविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर सकारात्मक बदल घडून येत असल्याचे निदर्शनास आले. पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना देखील वाहतूक आणि स्वच्छतेचे महत्व अभ्यासक्रमाद्वारे देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही जाधव म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button