breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी भिडेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

नाशिक –  नाशिकमध्ये एक सभेत आंबे खाल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने बजावले आहेत. नाशिक महापालिकेने याप्रकरणी भिडे गुरुजी यांच्याविरोधात खटला दाखल केला असून, त्यावर आज सुनावणी झाली.

संभाजी भिडे यांच्याविरोधात महापालिकेने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर त्यासंदर्भात आधी (दि.7) रोजी सुनावणी झाली होती, तर आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ॲड. सुवर्णा शेफाल यांनी युक्तिवाद केला असता, तो ऐकून घेतल्यानंतर न्या.जयदीप पांडे यांनी संभाजी भिडे यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयामार्फत त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची नाशिकमध्ये गेल्या 10 जून रोजी सभा झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button