breaking-newsमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या डिजिटल साक्षरतेसाठी प्रयत्न

नवी दिल्ली – येस बॅंकेने काही राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 10,000 शेतकऱ्यांना गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्‍टिसेसवरील कार्यशाळा, डिजिटल बॅंकिंग उपक्रम, तसेच आर्थिक समावेशकता व डिजिटल साक्षरता उपलब्ध करण्यासाठी नॅशनल स्किल्स फाउंडेशन ऑफ इंडियाशी (एनएसएफआय) भागीदारी केली आहे. कार्यशाळात संवादात्मक व्हिज्युअल व ऑडिओ माध्यमे यांचा वापर समाविष्ट आहे. या कार्यशाळांमार्फत, बॅंकेचे उद्दिष्ट 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे आहे. भारतातील शेती-प्रणित व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध होणे गरजेचे आहे.

कार्यशाळेच्या ठळक वैशिष्ट्‌यांमध्ये अर्थसहाय्य/कर्जे, कर्जविषयक उपलब्ध साधने आदीच्या मूलभूत बाबींचा समावेश आहे. शेतीच्या प्रक्रियांमध्ये ठिबक सिंचन, कार्यक्षम खते, योग्य तंत्र, सेंद्रिय शेती अशा पद्धतींचा वापर केल्यास कार्यक्षमता व उत्पादनाची गुणवत्ता वाढते. येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी सांगितले, देशातील लोकसंख्येला आर्थिक व्यवस्थेमध्ये किती प्रमाणात समाविष्ट करून घेण्यात आले आहे, यावर शाश्वत वाढ अवलंबून असते. सरकारने कृषी समुदायामध्ये आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी अनेक उपाय अवलंबले आहेत. आर्थिक समावेशकतेला व समावेशक प्रगतीला आणखी चालना देण्यासाठी आर्थिक शिक्षण देणे गरजेचे आहे. समावेशक आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व अन्नसुरक्षेची तरतूद करणे या देशव्यापी उद्देशासाठी गरजेचे असलेले प्रयत्न करण्यासाठी येस बॅंक व एनएफएसआय उत्सुक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button