breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शहरात 28 हॅाटेलमध्ये अनधिकृत बांधकामे

कारवाईकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ः हॅाटेल मालकांना बजाविल्या नोटीस
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 28 हॅाटेल मालकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी आणि अग्नीशामक विभागाचा ना हरकत दाखला न घेता वाढीव अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे हॅाटेल चालविणा-या 28 मालकांना नोटीस बजाविण्यात आल्या असून त्या हॅाटेलवर कारवाई करण्याकडे बांधकाम व परवाना विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.
मुंबईतील कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 नागरिकांचा नाहक जीव गेला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत हॉटेल्सचे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर अनधिकृतपणे हॅाटेलमध्ये वाढीव बांधकाम केलेले व सुरक्षेदृष्टीने हॅाटेलमध्ये कुठलीच व्यवस्था नसल्याने अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) नसलेल्या सर्व हॉटेल्सवर धडक कारवाई करणे आवश्यक आहे.

शहरात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. तसेच, हॅाटेल चालविलेल्या ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करुन व्यवसाय करता येत नाही, असे असले तरी, शहरात मोठमोठ्या हॅाटेल मालकांनी महापालिकेला अंधारात ठेवून अनधिकृतपणे हॉटेल व्यवसाय तेजीत सुरू आहे.
शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये रूफ टेरेस करून अतिरिक्त व असुरक्षित काम करण्यात आले आहे. तसेच पार्किंगमध्ये व्यावसायिकांनी बिनदिक्कतपणे हॉटेल व्यवसाय चालू केला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवणाचा अस्वाद घेण्यास येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात अनधिकृत वाढीव बांधकाम, अतिक्रमण आणि अग्निशामक परवाना आहे किंवा नाही हे तपासले गेले आहे.

यामध्ये 28 हॉटेल मालकांना नोटीस बजाविली असून ती अनधिकृतपणे चालविली जात आहे. त्यात चिखलीतील सूर्याजी हॅाटेल, न्यू पुर्णा हॅाटेल, बो-हाडेवाडीचे सिल्वर ब्लू हॅाटेल, भोसरीतील विश्वविलास बिर्याणी हॅाऊस, खराळवाडीतील हॅाटेल लोटस कोर्ट, मोरवाडीतील वार्विक्यू नेशन, साने चैाकातील हॅाटेल तन्मय बार-रेस्टोरंट, नाशिक फाट्याचे हॅाटेल अशोका, कासारवाडीचे हॅाटेल शेर ए पंजाब, हॅाटेल पिनॅकल, पिंपरीतील हॅाटेल रैानक फॅमिली रेस्टोरेंट, वाकडचे सयाजी हॅाटेल, हॅाटेल अवसोलूट बार्विक्यू, हॅाटेल विशाल कासार, पिंपळे सैादागरचे डिग्रीज, योलो गॅस्ट्रो बार, वे लीफ बिस्ट्रो हे सर्व हॅाटेलमध्ये अनधिकृत बांधकाम तपासणीत आढळून आले आहे.

तसेच अग्नीशामक विभागाने रुफ टॅाप हॅाटेलची केलेल्या संयुक्त तपासणीत नाशिक फाटाचे मराठा खानावळ, लांडेवाडीचे ब्लू पाल्मस, चोवीसावाडीचे बरासु व्हेज अॅण्ड नॅानव्हेज, उद्यमनगरचे आर.आर.हॅाटेल, हॅाटेल एम्पायर गार्डन, धावडेवस्तीचे हॅाटेल सोनाली बार आणि रेस्टोरंट, हॅाटेल प्रतिक, मोशीचे हॅाटेल सिल्वर ब्लू, निगडी प्राधिकरणातील हॅाटेल कृष्णा, हॅाटेल तरंगण, चिंचवडचे हॅाटेल सूर्यकिरण, मोरवाडीचे सेन्ट्रल मॅाल, पिंपरीतील क्रिस्ट्रल कोर्ट, प्राधिकरणातील हॅाटेल सावली यासह अनेक हॅाटेल मालकांकडे अग्नीशामक विभागाचा ना हरकत दाखला घेतलेला नाही. याबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे बांधकाम विभागातील एका अधिका-यांने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button