breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक स्थायी सदस्यांना कधी मिळणार?

उद्यान विभागाचा भोंगळ कारभार, स्थायीसमोर अंदाजपत्रक मान्यतेला

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वृक्ष प्राधिकरण समितीने सन 2018-19 चे सुधारीत आणि सन 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक उद्या (मंगळवारी) होणा-या स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवले आहे. हे अंदाजपत्रक स्थायीपुढे मान्यतेसाठी येवूनही ते स्थायीच्या सदस्यांना अभ्यासास अध्याप मिळालेले नाही. त्यावरुन उद्याच्या स्थायी सभेत अंदाजपत्रकांच्या मान्यतेवरुन उद्यान विभागाचे अधिकारी सदस्यांच्या रडारवर राहणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने गतवर्षी वृक्षाऐवजी ठेकेदारांचे संवर्धन करणारे अंदाजपत्रक सादर केल्याची टीका झाली होती. वृक्ष प्राधिकरणाने वृक्ष गणना, रस्ते सुशोभीकरण, खड्डे खोदाई, बीयाणे खरेदी, ठेकेदारी पद्धतीने वृक्षसंवर्धन, पिंजरे खरेदी, बेंचेस खरेदी, पिंजरे दुरुस्ती या कामांवर भरीव तरतूद करण्यात आली होती.
महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन करणे अधिनियमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष संवर्धन विभागाने सन 2018-19 चे सुधारीत आणि 2019-20 चे मूळ वार्षिक अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरणाने उद्याच्या स्थायी सभेत मान्यतेला ठेवले आहे. वृक्ष प्राधिकरणाने तयार केलेले व मंजूर केलेले अंदाजपत्रक असून सन 2018-19 चे सुधारीत व सन 2019-20 चे मुळ अंदाजपत्रकात 28 कोटी 67 लाख 16 हजार रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मांडले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेपुढे सादर होईल.

गतवर्षींच्या सन 2018-19 मधील अंदाजपत्रकात नर्सरी साहित्य देखभाल – दुरुस्ती (8 लाख), फळाफुलांचे प्रदर्शन (20 लाख), झाडांचे पुनर्रोपण (20 लाख), खड्डे खोदाई (1 कोटी 20 लाख), वृक्ष प्राधिकरण सदस्यांचा दौरा (20 लाख), नामफलक खरेदी व दुरुस्ती (5 लाख), पिंजरे दुरुस्ती (15 लाख), वृक्ष गणना ( 6 कोटी), ताराकुंपण देखभाल – दुरुस्ती (50 लाख), पिंजरे खरेदी (35 लाख), झाडे रोपे व बीयाणे खरेदी (75 लाख), वृक्षसंवर्धन विभागाची विविध कामे करणे ( 25 लाख), ठेकेदारी पद्धतीने वृक्षसंवर्धन (70 लाख), पाणीपुरवठा विषयक कामे (30 लाख), दुर्गादेवी उद्यान देखभाल (50 लाख), गायरान आणि मोकळया जागांवर वृक्षारोपण करणे (50 लाख), गायरान आणि मोकळया जागांअंतर्गत रस्ते करून वृक्षारोपण करणे (50 लाख), वृक्ष रोपण – संवर्धन (3 कोटी), बेंचेस खरेदी (25 लाख), टायर ट्युब खरेदी (19 लाख) आणि रस्ते सुशोभीकरण (2) या कामांचा समावेश होता. त्यातील कामावर किती खर्च झाला. किती कामे पुर्ण झाली. त्यावरुन सदस्य अधिका-यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. याशिवाय सन 2019-20 मधील मुळ अंदाजपत्रकात काय करणार, याबाबतही जाब विचारला जाणार आहे.

तसेच हे अंदाजपत्रक अद्याप स्थायी समितीच्या सदस्यांपुढे आलेले नाही. त्यांचा सदस्यांनी नीट अभ्यासही केलेला नाही. त्यावरुन संबंधित अधिका-यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी सांगितले.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button