breaking-newsपिंपरी / चिंचवड

विरोधी पक्षनेत्यांनी धनगर समाजाची माफी मागावी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मोरवाडी चौकात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांची दरवर्षी जयंती साजरी केली जात आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आहिल्यादेवी यांच्या जयंतीवर महापालिकेकडून होणाऱ्या खर्चाबाबत शंका उपस्थित करून जयंती कार्यक्रमाला विरोधच केल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर आणि आहिल्यादेवी उत्सव कमिटी पिंपरीचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी केला आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर, आहिल्यादेवी उत्सव कमिटी पिंपरीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, ऑल इंडिया धनगर समाज या संघटनेचे अध्यक्ष दिपक भोजने, रुपीनगर येथील आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, सांगवी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष दादासाहेब चितळकर, थेरगाव येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश पाडुळे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, महापालिकेमार्फत आहिल्यादेवींची जयंती साजरी व्हावी, अशी पिंपरी-चिंचवडमधील तमाम धनगर बांधवांची मागणी होती. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने पाच वर्षापूर्वी जयंती कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली. गेल्या पाच वर्षांपासून मोरवाडी चौकातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेमार्फत विविध कार्यक्रम राबवून त्यांची जयंती साजरी केली जात आहे. त्याद्वारे आहिल्यादेवींचे महान कार्य पुढच्या पिढीला सांगण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. असे असताना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवर महापालिकेकडून होणाऱ्या खर्चाबाबत शंका उपस्थित करून जयंती कार्यक्रमाला एकप्रकारे विरोधच केला आहे, याप्रकरणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरातील धनगर बांधवांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button