विधिच्या पाचवर्षीय अभ्यासक्रम: प्रवेश प्रक्रियेचे बिगुल वाजले
पुणे – मागील दोन वर्ष उशीरा सुरु होणारी विधी प्रवेशाची केंद्रीय प्रवेश पध्दतीने राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रियेला यंदा सुरुवात झाली आहे. महाविद्यालयांची नोंदणीला राज्यभरातून सुरुवात झाली असून लवकरच प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्यासही सुरुवात होणार आहे. याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाकडून विधि महाविद्यालयांना नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी दि. 28 मे पर्यंत www.mah.llb5admission.in या संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावयाची आहे. तर त्यांची प्रत्यक्ष कागदपत्रे दि. 30 मेपर्यंत कार्यालयात जमा करायची आहेत. मागील दोन वर्षापासून विधी प्रवेशासाठी केंद्रीय पध्दतीने पात्रता परीक्षा घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार यंदा महाविद्यालयांच्या नावनोंदणीला सुरुवात झाली असून यामधून कोणत्या महाविद्यालयांत पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी किती जागा आहेत, ही माहिती स्पष्ट होणार आहे.