breaking-newsक्रिडा

वासिम जाफरची धावांची भूक संपेना, वयाच्या ४१ व्या वर्षी झळकावले ५५ वे शतक

लवकरच आपला ४१ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या वासिम जाफरच्या प्रथमश्रेणी सामन्यातील ५५ व्या शतकाच्या मदतीने विदर्भाने गुजरातच्या ३२१ धावांना उत्तर देताना चांगली सुरुवात केली. रविवारी रणजी ट्रॉफी एलिट ग्रूप अ मधील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ३ गड्यांच्या बदल्यात विदर्भाने २३८ धावा केल्या. जाफरने १२६ धावा बनवल्या. मुंबईकडून विक्रमाचे इमले बांधणाऱ्या वासिमने गेल्या काही काळापासून विदर्भाकडून खेळण्यास सुरुवात केली आहे.

वासिमने आपल्या खेळीत १७६ चेंडूचा सामना करत १३ चौकार आणि २ षटकार लगावले. याचदरम्यान त्याने कर्णधार फैज फजल (४६) सह दुसऱ्या गड्यासाठी ८४ धावा आणि गणेश सतीश (नाबाद ४५) बरोबर तिसऱ्या गड्यासाठी १३४ धावांची भागीदारी केली. विदर्भ अजूनही ८३ धावांनी पिछाडीवर आहे. पण त्यांचे ७ गडी अजून बाकी आहेत.

तत्पूर्वी, गुजरातने ६ गड्यांच्या बदल्यात २६३ धावांवरुन आपल्या डावाची सुरुवात केली. त्यांच्याकडून ध्रुव रावल (७९) आणि करण पटेल (५५) दोघांनी अर्धशतक ठोकले. केतन पटेलने रविवारी शतक पूर्ण केले. विदर्भाकडून आदित्य सरवटेने ७१ धावा देत ४ गडी टिपले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button