breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वाटेगाव जत्रा’, ‘चित्रपट महोत्सव’, ‘मेट्रो नामकरण’बाबत सकारात्मक निर्णय घेऊ – महापौरांचा विश्वास

  • अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या पूर्व नियोजनाची पालिकेत बैठक
  • जयंती महोत्सव समितीच्या पदाधिका-यांसोबत झाली चर्चा

पिंपरी, (महाईन्यूज) – पवनाथडी व भीमथडी जत्रेच्या धर्तीवर ‘वाटेगाव जत्रा’, ‘अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव’, पारंपारिक स्पर्धांचे नियोजन तसेच ‘लहूजी वस्ताद साळवे मेट्रो’ असे नामकरण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास महापौर राहूल जाधव यांनी बैठकीत व्यक्त केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाचे नियोजन सुयोग्यपणे करण्याच्या सूचना देखील महापौर जाधव यांनी दिल्या.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या पूर्व नियोजनाची बैठक महापालिकेत आज पार पडली. बैठकीस लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास विकास महामंडळाचे सदस्य मनोज तोरडमल, विधी समिती सभापती आश्विनी बोबडे, क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्य संदिप वाघेरे, माऊली थोरात, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, समाज विकास अधकारी संभाजी ऐवले, उपअभियंता विजय भोजने यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भवाळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, प्रा. धनंजय भिसे आदी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, सर्व समाज बांधवांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व शहरवासियांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. पवनाथडी व भीमथडी जत्रेच्या धर्तीवर वाटेगाव जत्रा, अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव, पारंपारिक स्पर्धांचे नियोजन तसेच लहूजी वस्ताद साळवे मेट्रो नामकरण करणेच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा प्रबोधनपर्व कार्यक्रम एका समाजापुरता मर्यादित नसावा, कारण अण्णाभाऊंचे साहित्य व त्यांचे कार्य सर्वसमावेशक आहे, असेही ते म्हणाले.

  • पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, शासन योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. सर्व स्तरातील समाज बांधव या प्रबोधन पर्वात सहभागी असतात. या प्रबोधन पर्वात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या जीवन पटावर आधारित पुस्तके द्यावीत, तसेच विविध महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट, लघुपट दाखवावेत.

स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वासाठी निधी कमी पडू देणार नाही. या पर्वानिमित्त समाजातील शालेय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात यावे.

  • लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देणेबाबत महापालिका सभेत ठराव पारित करुन शासनाकडे पाठविण्यात यावा. समाजातील १० विद्यार्थ्यांचा एमपीएससी व युपीएससीसाठी येणारा खर्च महापालिकेने करावा. तसेच, अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भवाळ, सुनील भिसे, धनंजय भिसे, युवराज दाखले यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनीही अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाबाबत आपल्या सूचना मांडल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button