breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड-पिंपळे निलखमधील परिसर ‘स्मार्ट प्रभाग’ बनविणार – सभापती ममता गायकवाड

प्रभाग क्रमांक 26 मधील विकास कामे अंतिम टप्प्यात 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – वाकड-पिंपळे निलख परिसरात कॅाक्रिंटचे रस्ते, विरंगुळा केंद्र यासह विविध विकास कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण होवून प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये तब्बल 92.85 कोटी रुपयांची विकास कामे हाती घेतल्याने परिसराचा निश्चित कायापालट होईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी दिली.

वाकड-पिंपळे निलखच्या प्रभाग क्रमांक 26 मधील रस्ते, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र यासह अन्य काही विकास विषयक कामांची मागणी प्रभागातील नागरिकांनी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या मागणीनुसार तेथील विविध विकास कामांचा स्वताः पाठपुरावा करुन त्या कामांना मंजूरी दिली.
यामध्ये प्रभाग क्रमांक २६ मधील काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करणे, पिंपळे निलखमधील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करणे, कावेरी सब-वे ते पिंक सिटी रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करणे, वाकड पिंपळे निलखमध्ये विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र करणे, वाकडमध्ये रोड फर्निचरची कामे करणे, वाकड गावठाणातील रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करणे, भुजबळवस्ती मधून कालाखंडक मार्ग ते भूमकरवस्ती पर्यंत हा हिंजवडी ३१ एमडीआर रस्त्यालगत जोडणारा ३० मीटर रस्ता विकसित करणे, अशी एकूण ९२.८५ कोटीची विकास कामे करण्यात येणार आहेत.

वाकड-पिंपळे निलख परिसर ‘स्मार्ट प्रभागा’च्या दृष्टीने सर्व विकास कामे करण्यात येणार आहेत. सर्व कामांची प्रशासकीय कामकाज पुर्ण करुन त्या कामांना मंजुरी देवून त्या कामाची निविदा प्रक्रिया करेपर्यंतचा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरील सर्व विकास कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केल्याचे स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button