breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लसीकरणानंतर मुलीला पॅरालिसिस झटका

पुणे – गोवर व रुबेला लसीचा (एमआर) डोस दिल्यानंतर हडपसर येथील एका आठ वर्षांच्या मुलीला ताप येऊन तिसऱ्या दिवशी पॅरालिसिससारखा झटका आल्याने तिला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) हा आजार झाल्याचे निदान ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले. लसीकरणामुळे तिला त्रास झाल्याचा पालकांनी आरोप केला आहे. परंतु, लसीकरण आणि तिच्या आजाराचा कसलाही संबंध नसल्याचा दावा हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह आरोग्य विभागाने केला आहे.

दरम्यान, मुलीवर ससून हॉस्पिटल डॉक्टरांचे उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. गोवर रुबेला लसीकरणादरम्यान हडपसर येथील महापालिकेच्या शाळेत लसीकरण करण्यात आले. श्वेता संतोष कांबळे (वय ८, रा. शीतळादेवी मंदिर, मांजरी, हडपसर) असे त्रास झालेल्या मुलीचे नाव आहे. श्वेता ही हडपसर येथील ती विठ्ठलनगर येथील कै. निवृत्ती तुकाराम पवार या महापालिकेच्या शाळा क्रमांक २०७ मधील शाळेत दुसरी इयत्तेत शिकत आहे. ‘लसीकरण मोहिमेंतर्गत डॉक्टरांनी तिला शनिवारी (दि. १) इंजेक्शन देऊन तिला लसीकरण केले. त्यानंतर तिला दोन दिवस ताप आला.  लसीकरणामुळे त्रास होऊ शकतो, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले; पण मंगळवारी तिच्या हात-पायांमधील ताकद गेल्याचे दिसून आले. तिला चालता येत नव्हते. तिला हडपसरच्या साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून नंतर ससून हॉस्पिटलला आणले,’ असे तिचे वडील संतोष कांबळे यांनी सांगितले.

श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ लागल्याने तिला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तपासणीदरम्यान ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) हा शरीरातील नसांवर हल्ला करणारा विकार झाला झाला आहे. हा आजार कोणत्या विषाणूंपासून झाला आहे, याचे निदान करण्यासाठी रक्त, शौच, सेरेब्रल सिंड्रोम फ्लुइड घेऊन तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) पाठविले आहे. त्याचा अहवाल लवकरच येईल, अशी माहिती ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button