breaking-newsराष्ट्रिय

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपेक्षा अर्थमंत्री मोठे!

  • मनमोहन सिंग यांचे पुस्तकात मत

‘रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर हा देशाच्या अर्थमंत्र्यांपेक्षा मोठा नसतो. अर्थमंत्र्यांनी एखाद्या निर्णयाबाबत आग्रह धरल्यास गव्हर्नर त्याला नकार देऊ शकत नाही. अर्थमंत्र्यांचे म्हणणे पटेत नसेल, तर त्याला पद सोडायची तयारी ठेवावी लागते’, असे स्पष्ट मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. सध्या रिझव्‍‌र्ह बँकेशी सुरू असलेल्या वादात हे विधान सरकारच्या मदतीला येण्याची शक्यता आहे.

मनमोहन सिंग यांच्या मुलीने लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरुशरण’ पुस्तकात मनमोहन सिंग यांचे हे मत नोंदवण्यात आले आहे. हे पुस्तक २०१४ साली प्रकाशित झाले होते.

मनमोहन सिंग यांनी या पुस्तकात अनुभव सांगितले आहेत. ‘अर्थमंत्री व रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते. गव्हर्नर म्हणून निर्णय घेताना मलाही सरकारला विश्वासात घेऊनच काम करावे लागायचे’, असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button