breaking-newsराष्ट्रिय

राहुल गांधींना विदेशी संबोधणाऱ्या बसप उपाध्यक्षांची मायावतींकडून हकालपट्टी

लखनौ – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या विदेशी मातोश्री सोनिया गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करीत असल्याने ते पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार ठरत नाहीत त्याऐवजी मायावती याच मोदींना सक्षमपणे तोंड देणाऱ्या नेत्या असल्याने त्यांचीच पंतप्रधानपदासाठी निवड व्हावी असे विधान बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह यांनी काल केले होते. त्यांच्या या विधानांची गंभीर दखल घेऊन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी त्यांची त्वरीत या पदावरून हकालपट्टी केली आहे.

या संबंधात मायावती यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाविषयी व्यक्तीगत मतप्रदर्शन करणाऱ्या बसप उपाध्यक्षांच्या विधानांची आपण गंभीर दखल घेतली असून आपण त्यांची या पदावरून त्वरीत हकालपट्टी करीत आहोत. काल बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत बोलताना जय प्रकाशसिह यांनी हे विधान केले होते. तथापी ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे आणि त्यांचे हे मत पक्षाच्या संस्कृतीच्या विरूद्ध आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाशी बहुजन समाज पक्षाचा काही संबंध नाही असेही मायावती यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button