breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहुल गांधींचा मुंबईत मेगा रोड शो

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर शेवटच्या चौथ्या टप्प्याच्या मुंबईतील प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी २५ एप्रिलला येणार आहे. मुंबईतील ६ मतदार संघात त्यांच्या मेगा रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी काँग्रेसचे देशभरातील स्टार प्रचारक हजेरी लावण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी हे अमेठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गेले काही दिवस राहुल यांचा या भागात प्रचाराचा दौरा चालू आहे. हा दौरा संपवल्यानंतर राहुल मुंबईत प्रचारासाठ येणार आहेत. याआधी त्यांची बीकेसी येथे जाहिर सभा झाली होती.

देशभरातील मतदानाचे वेळापत्रक लक्षात घेता कोण कोण बडे नेते राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी हजर राहू शकतात, याबाबतचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दक्षिण मध्य मुंबईतही यापैकी काही स्टार प्रचारक प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यासाठी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राज बब्बर, तसेच पक्षातील यंग ब्रिगेडचे ज्योतीरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दिग्गज नेत्यांच्या तारखा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजते.

राज्यात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिलला होणार असून मुंबई, ठाणे आणि नाशिक यासारख्या महत्वाच्या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष करून मुंबईतील लढतींकडे अवघ्या देशाचे लक्ष असून मुंबईत भाजप-शिवसेनेला मात देण्यासाठी काँग्रेसचे कंबर कसली आहे. एकूणच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या स्टार प्रचारकांच्या सहभागामुळे दक्षिण मध्य मुंबईत चांगलीच रंगत निर्माण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button