breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रावादीचे नाना काटे, मोरेश्वर भोंडवे यांच्यासह इच्छुकांचा पत्ता कट?

  •  शिवसेना गटनेते कलाटेंची राष्ट्रवादीशी जवळीक
  • चिंचवड विधानसभेची समीकरणे बदलण्याची शक्यता

– अमोल शित्रे

पिंपरी। पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा उमेदवारीच्या चर्चेनंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पार्थ पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. विशेष म्हणजे, कार्यक्रमानंतर भोजन आस्वादही घेतला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या नाना काटे, मोरेश्वर भोंडवे  यांच्यासह इच्छुकांचा पत्ता कट होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रावादीचे विद्यामान नगरसेवक आणि माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी आपल्या प्रभागात संदीप कदम यांच्या स्मरणार्थ ‘एलआयजी’ ग्रुपच्या सहकार्याने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान विधीमंडळ गटनेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्याचवेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना व्यासपीठावर निमंत्रण करण्यात आले होते. एकप्रकारे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर कलाटे यांना मानाचे स्थान देण्यात आले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा करताना ‘कोण पार्थ पवार…मी जनसामान्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे’…अशी जहरी टीका केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पार्थ पवार यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली. इतकेच नव्‍हे तर कार्यक्रमानंतर दोघांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मध्यंतरी, विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास चिंचवडची जागा भाजपला द्यावी लागेल. परिणामी, उमेदवारीची अडचण होवू नये म्हणून कलाटे यांचे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही निकटवर्ती राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुक नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे आदींची अस्वस्थता वाढली होती. त्यातच आता राहुल कलाटे यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचे दिसत आहे. परिणामी, राष्ट्रवादीतील इच्छुकांचा पत्ता कट होणार काय? अशी चर्चा राजकीय जाणकार करू लागले आहेत.

खासदार श्रीरंग बारणे यांना आव्‍हान?

वास्तविक, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि गटनेते राहुल कलाटे यांच्यात राजकीय सख्य नाही. दोघांमध्ये एकवाक्यताही दिसत नाही. स्मार्ट सिटी आणि अन्य समितींवरील पदांच्या वाटपावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी बारणे कदापि कलाटेंना मदत करणार नाहीत. तसेच, लोकसभेसाठी कलाटे कुठल्याही परिस्थितीत बारणेंना साथ देणार नाहीत. लोकसभा निवडणूक अगोदर होणार आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत आजपर्यंत डावलल्याचा वचपा काढण्यासाठी राहुल कलाटे बारणेंविरोधात मोहीम उघडतील, अशी शक्यता राजकीय जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमात पार्थ पवार यांची भेट झाली. भेटल्यानंतर त्यांनी संवाद केला. मुळात मी शिवसेना पक्षाचा गटनेता आहे. पक्षाचेच काम करणार आहे. खासदार बारणे अथवा अन्य कोणाच्याही विरोधात जाण्याचा प्रश्न येत नाही.

– राहुल कलाटे, गटनेता, शिवसेना. 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button