breaking-newsराष्ट्रिय

राजस्थानमध्ये योगविक्रम – एकाच वेळी लाखापेक्षा अधिक लोकांनी केली योगसाधना

कोटा/जयपूर (राजस्थान) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजस्थानने एका जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. योग गुरू रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान सरकार, पतंजलि योग पीठ आणि कोटा जिल्हा प्रशासन यांनी मिळून आयोजित योग शिबिरात वसुंधरा राजेंसह एक लाखापेक्षा अधिक लोकांनी योगासने केली. या विक्रमाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने नोंद घेतली आणि एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी योग करण्याचा हा एक जागतिक विक्रम असल्याचे प्रमाणपत्र योग गुरू बाबा रामदेव आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दिले आहे. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे दोन प्रतिनिधी या शिबिरात उपस्थित होते.

आरएसी मैदानवर आयोजित या शिबिरासाठी सुमारे दोन लाख लोक हजर असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये मंत्री, आमदार आणि अधिकारीवर्गाचा समावेश आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Swami Ramdev

@yogrishiramdev

Lakhs of Yogis practiced today with CM @VasundharaBJP & @Ach_Balkrishna and made the Guinness World Record, @GWR for highest number of people practising Yoga together. 100+ other world records in Yoga were also made 🙏

शिबिरासाठी लावण्यात आलेले कॅमेरे आणि ड्रोन्सनी काढलेल्या फोटोंनुसार 1 लाख 5 हजार लोकांनी एकाच वेळी योगासने करून विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी एकाच वेळी 55 हजार लोकांनी एकाच वेळी योगासने करण्याचा विक्रम होता. यात शालेय विद्यार्थ्याचे प्रमाण मोठे असते. आरएसी मैदानावरचे योग शिबिर पहाटे 5 वाजता सुरू झाले. जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यासाठी साडेसहा ते सात या वेळात 15 प्रकारची योगासने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button