मोदी-गडकरींच्या फेकाफेकींनी ‘लक्ष्मी’ थक्क – राज ठाकरे
लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशणा साधला आहे. आपल्या कुंचल्यातून आणखी एक व्यंगचित्र साकारत त्यांनी टीका केली आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यांच्यापुढे लक्ष्मी उभी आहे आणि ती म्हणते आहे की बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे. लक्ष्मीपूजन असा मथळा देऊन हे व्यंगचित्र साकारण्यात आले आहे.
आपल्याला ठाऊकच आहे की गेल्या साडेचार वर्षात विकासासाठी एवढे मोठे पॅकेज देऊ, असा विकास करू, तसा विकास करू अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांनी देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केल्या आहेत. या घोषणांवर भाष्य करणारे हे व्यंगचित्र राज ठाकरेंनी पोस्ट केले आहे. दिवाळीनिमित्त व्यंगचित्रांची मालिकाच त्यांनी सुरु केली आहे. त्याच मालिकेतले हे चौथे व्यंगचित्र आहे.