breaking-newsआंतरराष्टीय

मेंदूरोगांवर उपचारासाठी यंत्र विकसित

लॉसएंजल्स – मेंदूतील पेशींना विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून उद्दीपन देऊन रुग्णांना फेफरे व पार्किन्सन (कंपवात)यात उपचार करण्यासाठी बिनतारी यंत्र विकसित करण्यात आले असून ते ब्रेन पेसमेकर वॉण्ड या नावाने ओळखले जाईल. हे यंत्र म्हणजे मेंदूउद्दीपक असून त्याचे काम मेंदूतील विद्युत घडामोडी तपासून काही वावगे आढळल्यास विद्युत उद्दीपन देणे हे आहे.

अमेरिकेत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यामुळे मेंदूरोगातील उपचारात बदल होणार आहेत. कंपवात व फेफरे यात हे उपकरण उपयोगी असून मेंदूच्या इतर रोगातही ते साहाय्यक ठरणार आहे, असे नेचर बायोमेडिकल इंजिनीयरिंग या नियतकालिकात म्हटले आहे. मेंदूला धक्का किंवा इजा होण्यापूर्वीचे विद्युत संदेश त्यांची कंप्रता यात तपासली जाणार आहे. त्यानंतर किती विद्युत उद्दीपन गरजेचे आहे हे ठरवले जाईल. या उपकरणाचा पुरेपूर वापर करण्यासाठी अजून काही वर्षे जावी लागणार आहेत.

वायरलेस आर्टिफॅक्ट फ्री न्यूरोमॉडय़ुलेशन डिव्हाइस म्हणजे वॉण्ड असे त्याचे नाव असून त्यात बिनतारी यंत्रणा वापरली आहे. यात विद्युत उद्दीपन देतानाच विद्युत संदेशांची नोंदणीही होणार असून त्याचा दुहेरी उपयोग आहे.

एखाद्या रुग्णाच्या मेंदूरोगावर नेमकी कोणती उपचारपद्धती वापरायची हे ठरवणे कठीण असते पण यात ती ठरवण्यातही मदत होणार आहे, असे प्रा. रिकी म्युलर यांनी सांगितले. यात परिणामही चांगला असून खर्चही कमी होणार आहे. मेंदूच्या १२८ बिंदूवरील विद्युत सक्रियता व्ॉण्ड यंत्रात नोंदली जाते. इतर उपकरणांत केवळ आठ बिंदूवरील विद्युत संदेश टिपता येतात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button