breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत तीन वर्षांचा मुलगा गटारात पडला, शोध सुरु

घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एम्बेड केलेला व्हिडिओ

ANI

@ANI

Mumbai: A 3-year-old boy fell in a gutter in Ambedkar Nagar area of Goregaon around 10:24 pm yesterday. Rescue operations underway.

६१ लोक याविषयी बोलत आहेत

गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे ही घटना घडली असून काल येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील गटार उघडे होते. त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्याने तो चुकून या उघड्या गटारात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरु केला.

दरम्यान, गेल्या दहा तासांपासून बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मात्र, पालिकाच या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button