breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळात पार्थ पवारांच्या प्रचाराचा वेग वाढला, उद्यापासून दिग्गजांच्या तोफा धडाडणार

  • उद्या शरद पवार यांची तळेगाव दाभाडे येथे जाहीर सभा
  • नेते धनंजय मुंडे यांनी केली विरोधकांची बोलती बंद

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गेली कित्येक प्रहर शिवसेनेने राखून ठेवलेला मावळ लोकसभेचा गड हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सत्ताधा-यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. खासदार बारणे यांच्यापेक्षा अधीक पटीने आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार जोर धरत आहे. कोपरा सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, पदयात्रा, दुचाकी रॅली काढून पार्थ पवार यांनी अख्खा मतदार संघ पिंजून काढला आहे. राज्यातील तीन टप्प्यातले मतदान पार पडल्यानंतर आता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचा फौजफाटा मावळात दाखल झाला आहे. मावळात आता दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत.

मावळ लोकसभेचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे पवार परिवारातून असल्यामुळे मतदारांना मावळात परिवर्तन अटळ असल्याची खात्री पटली आहे. नोकरी, उद्योग, व्यवसाय, शेती मालाला भाव अशे सर्व प्रश्न सुटणार याची शंभर टक्के हमी दिली जात आहे. त्यातच पवार घराण्याला विकासाची पार्श्वभूमी असल्यामुळे मावळ मतदार संघातील मतदारांनी पार्थ पवार यांना स्वीकारले आहे. दोन्ही खासदार शिवसेनेचे निवडून दिले, तरी देखील गेल्या दहा ते पंधरा वर्षात काही विकास होऊ शकला नाही. सर्व प्रश्न जैसे थे असल्यामुळे शिवसेनेवर नागरिकांचा रोष वाढला आहे. त्यातच पार्थ पवार हे उच्चशिक्षीत आणि तरुण नेतृत्व असल्यामुळे तरुणांचा त्यांना खंबीर पाठिंबा मिळू लागला आहे. तर, ज्येष्ठ नागरिक, महिलांना पार्थ हे आशेचा किरण वाटू लागले आहेत. त्यामुळे मावळात आता परिवर्तन अटळ असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून उमेदवार पार्थ पवार हे मावळ मतदार संघातील पाड्यानपाड्या पिंजून काढत आहेत. तेथे राहणा-या नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. त्यांच्याशी जिव्हाळा निर्माण करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून शरद पवार आपल्या समोर उभे ठाकल्याचा भास होऊ लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला पार्थ यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवताना दिसत आहेत. प्रचारकार्यात तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढता दिसत आहे. आगामी काळात यात भर घालण्यासाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शेकाप आणि मित्र पक्षाचे दिग्गज नेते मावळात सभा घेत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांची उद्या तळेगाव दाभाडे येथे सभा आहे. सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, अजित पवार आदींनी कंबर कसली आहे.

उद्यापासून सभांचा वेग वाढणार आहे. प्रत्येक शहरी भागात सभा घेऊन मतदारांना विकासाची साद घातली जात आहे. मतदारांनाही बारामती आणि पिंपरी-चिंचवडसारखा विकास मावळात येण्याची आस लागली आहे. म्हणूनच पार्थ पवार यांना सर्व स्तरातून खंबीर पाठिंबा मिळत आहे. मात्र, शिवसेना नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button