breaking-newsपिंपरी / चिंचवड

मारहाण करत दोघांनी केली हॉटेलची तोडफोड

पिंपरी – चहाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी हॉटेल चालकाला मारहाण करत हॉटेलातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना देहूरोडमधील आंबेडकरनगरमध्ये घडली.

विकी शंकर (वय-20) आणि दीपक पांडे (दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील जगन्नाथ बोरसे (वय-40, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सुनील आणि त्याचा भाऊ अनिल हे दोघे हॉटेलवर होते. यावेळी आरोपी दारू पिऊन तेथे आले. स्वत:च्या हाताने चहा आणि बिस्कीट घेऊ लागले. सुनील यांनी त्यांना समजावून सांगितले असता पैसे मागितल्याच्या कारणावरून अनिल यांना मारहाण करत हॉटेलातील साहित्याची तोडफोड केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button