breaking-newsराष्ट्रिय

महिलांसाठी आणखी 100 ‘एक थांबा’ मदत केंद्रे स्थापणार

  • वर्धा जिल्ह्यामध्ये केंद्र सुरु करण्यास मान्यता 

नवी दिल्ली – घरगुती अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी देशभरात आणखी 100 ठिकाणी “ओएससी’ म्हणजेच एक थांबा मदत केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पीएबी म्हणजेच योजना मान्यता मंडळाने आज मंजुरी दिली. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या एक थांबा मदत केंद्राच्या यादीत महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे.

या मंत्रालयाने एप्रिल 2015 पासून आत्तापर्यंत देशात 182 केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून अत्याचाराला बळी पडलेल्या 1.3 लाख महिलांना मदत मिळवून देण्यात आली आहे. यामध्ये 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील महिलांचा समावेश आहे. या मदत केंद्रांमुळे पीडित महिलांना तातडीने साहाय्य मिळू शकते. 21 एप्रिल 2018 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी वर्षात प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मदत केंद्रांना 50,000 रुपयांचे वार्षिक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button