breaking-newsमहाराष्ट्र

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होणार- मुख्यमंत्री

मुंबई : आर्थिकवृद्धी आणि रोजगार निर्मितीसाठी सेवा क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. भारत हा जगातील तरुणांचा देश म्हणून विकसित होत आहे.२०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होणार असून याच वेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उत्पादन निर्मिती आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र देशात कायमच अग्रेसर असल्याचे सांगत सेवा क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होण्याकरिता सेवा क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सेवा क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान ५९ टक्के असून ते ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत असून त्यामध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्यात सेवा क्षेत्र विस्तारण्यासाठी पायाभूत सुविधांचे विस्तीर्ण जाळे उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने ज्या १२ सर्वोत्कृष्ट सेवा क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्या प्रत्येक घटकासाठी राज्यात पोषक असे वातावरण आहे. डिजिटल सेवांच्या माध्यमातून महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून त्याचा वापर करत सेवा क्षेत्राच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. देशाची आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सेवा क्षेत्र विषयक जागतिक प्रदर्शन आयोजित केले. त्याबद्दल केंद्रीय वाणिज्य विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button