breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापाैरांच्या प्रश्नावर क्रीडा सहाय्यक आयुक्त निरुत्तर

तीन दिवसात उत्तरे द्या, अन्यथा घरी जा, महापाैरांनी घेतला खरपूस समाचार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेचा क्रिडा विभाग अडगळीस पडला आहे. त्या विभागाकडे आयुक्तासह क्रिडा समितीचे पदाधिकारी लक्ष देत नाहीत. परंतू, महापाैर राहूल जाधव यांनी क्रीडा व प्रबोधिनी विभागावर तब्बल 22 प्रश्न विचारले. त्यातील एकाही प्रश्नावर सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे तीन दिवस सर्व प्रश्नाची सविस्तर, आकडेवारीसह उत्तरे द्या, अन्यथा घरी जा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसह क्रीडा प्रबोधिनीवर आज (शुक्रवारी) बैठक घेण्यात आली. यावेळी क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे यासह क्रीडा समिती सदस्य, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापाैर राहूल जाधव यांनी शालेय क्रीडा धोरण, महापाैर चषक क्रीडा स्पर्धेचे नियोजन, क्रिडा प्रबोधिनी कामकाज, गुणवंत खेळाडूंना शिष्यवृत्ती,  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिंक सहाय्य, मनपा परिसरात खेळाडूंना सोयी-सुविधा,  क्रीडा प्रशिक्षण केंद्रची स्थिती, साहसी क्रीडा प्रकारांना प्राधान्य, क्रीडा साहित्या खरेदी, उद्यानातील आेपन जीम, व्यायाम शाळा चालविण्याचे धोरण, क्रीडा वसतिगृह व विश्रामगृह तयार करणे,  क्रीडा ग्रंथालय व माहिती केंद्र, सार्वजनिक संस्था व ट्रस्ट दिले जाणारे अनुदान यासह विविध प्रश्नाचा भडीमार केला. यावर क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्तांना एकाही प्रश्नाचे नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांना सर्व प्रश्नाची सविस्तर व आकडेवारीसह सध्यस्थित तीन दिवसात देण्याच्या सुचना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button