breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – शिवसेनेची मागणी

पिंपरी –  पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दोघांच्या डोक्यात महापालिकेचे लोखंडी होर्डिंग्ज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत महापालिकेच्या गलथान कारभारामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने परिमंडल तीनचे डीसीपी गणेश शिंदे यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना शिवसेनेच्या शहर संघटिका सुलभा उबाळे, शहराध्यक्ष योगेश बाबर यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे की, शहरात अवकाळी पावसाने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये मोशीतील नंदू रमेश शहा आणि पुनावळेत कांताबाई भारती या निष्पाप नागरिकांचा लोखंडी होर्डिंग्ज पडून बळी गेला आहे.

शहरात बहुतांश होर्डिंग्ज अनधिकृतरित्या उभारलेले आहेत. त्या होर्डिंग्जचे आकारमान व वजन अधिक आहे. कित्येक होर्डिंग्जचा वाहतूकीला अडथळा निर्माण होवू लागला आहे. या होर्डिग्जमुळे शहर बकाल होवू लागले आहे. त्यामुळे त्या होर्डिंग्जमुळे भविष्यातही जीवित हानी होण्याची शक्यता आहे. अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिका प्रशासनाने अद्याप कारवाई केलेली नाही. परंतू, अनेक होर्डिग्ज चुकीच्या पध्दतीने नियमात बसून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व होर्डिग्जचा पंचनामा करुन संबंधितावर कडक कारवाई करावी, महापालिकेने हलगर्जीपणा दोन व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यातील प्रशासनास जबाबदार धरुन महापालिका आयुक्तांवर श्रावण हर्डीकरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना शहर संघटिका सुलभा उबाळे, शहर प्रमुख योगेश बाबर, युवराज कोकाटे, सचिन सानप, रोमी बंधु, रेखा दर्शिले, विक्रम वाघमारे, आबा लांडगे, सुरज लांडगे, सर्जेराव भोसले, प्रविण खिलारे, अमित शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button