breaking-newsUncategorizedमुंबई

मनसेचे भाजपला प्रत्युत्तर, आधी मोदींच्या दौ-याचा खर्चाचा तपशील जनतेला द्या!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कुणाच्या नावावर? अशी विचारणा करणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरील दौऱ्यांच्या खर्चाचा तपशील आधी जनतेला द्यावा’ अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य करायचं टाळून त्यांच्या सभेच्या खर्चाचा बोलबाला करणं हा राज ठाकरे यांचा दराराच म्हणावा लागेल, असेही ते पुढे म्हणाले.

राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौ-यावर असून विविध भागात सभा घेत आहेत. या सभा कुणासाठी आणि खर्च कुणाच्या नावावर? असा सवाल भाजपच्या विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर अशा विविध राज्यांचा दौरा केला. याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतील का? असा सवाल किल्लेदार यांनी केला आहे.

आतापर्यंत झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत त्यांनी कोणत्याही पक्षाचं चिन्ह, झेंडा न लावता अमूक उमेदवाराला मत द्या असं भाषण दिलेलं नाही. गेल्या ५ वर्षांच्या काळातील भाजपाची धोरणं आणि फसवेगिरी यांना बळी पडू नये, हेच आव्हान त्यांनी जागरूक नागरिकांना केलं. जाहीर सभा घेऊन पंतप्रधानाबद्दल आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांना नाही का? असा सवालही किल्लेदार यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button