breaking-newsआंतरराष्टीय

भारताने बनवली सर्जिकल स्ट्राइक स्पेशल फोर्स, आर्मी, नेव्ही, एअर फोर्सचे कमांडो एकत्र

दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेता भविष्यात सर्जिकल स्ट्राइक सारख्या कारवाया वारंवार कराव्या लागू शकतात. हीच बाब ध्यानात घेऊन सर्जिकल स्ट्राइक सारखे ऑपरेशन्स आणि गुप्त मोहिमा पार पाडण्यासाठी एका नव्या विभागाची स्थापना करण्याचे काम सुरु आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कमांडोंचा समावेश असेल.

लष्कराच्या स्पेशल फोर्सेसमधील मेजर जनरल रँकचा अधिकारी नव्या विभागाचा प्रमुख असेल. लवकरच या स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनचे काम सुरु होईल. स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनमध्ये सध्या नियुक्तीचे काम सुरु आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. स्पेशल फोर्सेसमध्ये असणारे तिन्ही सैन्य दलाचे कमांडो स्वतंत्रपणे काम करतील.

देशांतर्गत आणि देशाबाहेरील संवेदनशील मोहिमांची गुप्तपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या विभागावर असेल. कमांडोंचे हे विशेष पथक सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांना त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरना लक्ष्य करेल. लष्कराचे पॅरा कमांडो, नौदलाचे मार्कोस आणि हवाई दलाचे गरुड कमांडो या विशेष पथकाचा भाग असतील. सुरुवातीला या स्पेशल फोर्सेसमध्ये दीडशे ते दोनशे कमांडो असतील. नंतर त्यांची संख्या वाढवण्यात येईल. २ हजार कमांडोंची सुसज्ज फोर्स उभारण्याची योजना आहे. अन्य दोन सैन्य दलांपेक्षा लष्करातील कमांडोंची संख्या जास्त असेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button