breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताचं वर्ल्डकपचं स्वप्न भंगल, उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा 18 धावांनी पराभव

मँचेस्टर –  भारत-न्यूझीलंडदरम्यान काल अर्ध्यावर थांबलेला सेमीफायनलचा सामना आज पुढे खेळवला जात आहे. न्यूझीलंडने मंगळवारी 50 षटकांत 8 विकेट गमावून 239 धावा काढल्या. भारताला 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांचा फायनल प्रवेशासाठी संघर्ष सुरू आहे.  उपांत्य फेरीत भारत पराभूत झाला आहे, न्यूझीलंडकडून भारताचा 18 धावांनी पराभव झाला.

अशा गेल्या भारताच्या विकेट

– भारतीय संघाचा 18 धावांनी पराभव, न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल

– जडेजा 77 धावांवर झाला बाद; भारताला विजयासाठी 12 चेंडूत 31 धावांची गरज

– भारताला सहावा धक्का, हार्दिक पंड्या माघारी; भारताच्या 6 बाद 92 धावा. 

– भारतीय संघाची पाचवी विकेट, मोठा फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद

– भारतीय संघाला चौथा धक्का; दिनेश कार्तिक 6 धावांवर माघारी, निशमने पॉईंटमध्ये टिपला अप्रतिम झेल

– भारतीय संघाला तिसरा धक्का, सलामीवीर लोकेश राहुल देखील स्वस्तात बाद

– भारतीय संघाला दुसरा धक्का, कर्णधार कोहली(1) बाद

– दुसऱ्याच षटकात भारतीय संघाला धक्का, रोहित शर्मा स्वस्तात बाद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button