breaking-newsआंतरराष्टीय

भारताएवढय़ा भूभागावर चिनी रडाराचे लक्ष

  • जहाजे, विमाने, क्षेपणास्त्रांवर नजर

बीजिंग – चीनने नौदलासाठी नवीन रडार तयार केले असून त्याच्या मदतीने भारताच्या आकाराएवढय़ा प्रदेशाचा वेध सतत घेता येतो किंवा सतत त्या भागावर टेहळणी करणे शक्य आहे, असे वृत्त आहे.

चीनचे हे स्वदेशी बनावटीचे रडार चीनच्या नौदलासाठी महत्त्वाचे असून त्याच्या मदतीने चिनी सागरावर लक्ष ठेवता येणार आहे शिवाय शत्रू देशांची जहाजे, विमाने व क्षेपणास्त्रे त्याच्या निरीक्षणाच्या टप्प्यात येतात. चीनच्या ‘ओव्हर द होरायझन’ या रडार कार्यक्रमात सहभागी असलेल्या एका वैज्ञानिकाने ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ या वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे.  चिनी विज्ञान अकादमी व चिनी अभियांत्रिकी अकोदमी या दोन्ही संस्थांसाठी काम करणारे लिउ योंगटान यांनी सांगितले, की चीनच्या रडार तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात आली असून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदल युद्धनौकेसाठी रडार तयार केले आहे, त्याच्या मदतीने भारताएवढय़ा भूभागावर एकाच वेळी लक्ष ठेवता येईल. या रडारचा आकार आटोपशीर आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देशाचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार लिऊ व लष्करी वैज्ञानिक कियान किहू यांना बीजिंग येथे मंगळवारी ग्रेट हॉल ऑफ दी पीपल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

कियान यांना चीनच्या आधुनिक शिक्षण अभियांत्रिकीसाठी सैद्धांतिक प्रणाली तयार करण्यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. भूमिगत अण्वस्त्रविरोधी आश्रय सुविधा त्यांनी तयार केली आहे. लिऊ यांनी जहाजाच्या आकाराचे ओटीएच रडार तयार केले असून त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीची टेहळणी क्षमता वाढली आहे. पारंपरिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकावेळी केवळ वीस टक्के सागरी प्रदेशावर लक्ष ठेवता येते. आता ही क्षमता वाढली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button