breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजपने जनतेला ‘स्वप्नो का साैदागर’ दिलाय – धनंजय मुंडे

  • मावळात शिवसेनेची सत्ता, खासदारांंनी काय विकास केला
  • गोरगरींबाची घरे होवू नये, म्हणून खासदारांनी मंत्र्यांना निवेदने दिली

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भाजपने देशातील जनतेला नरेंद्र मोदी सारखा ‘स्वप्नो का साैदागर’ दिलाय, त्यामुळे मागील पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला अच्छे दिन आयेंगे, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देवू, युवकांना वर्षाला दोन कोटी रोजगार मिळेल, महागाई कमी करु, शेतक-यांना मालाला हमी भाव देवू अशी कित्येक स्वप्ने दाखविली, परंतू, त्या स्वप्नातील एक आश्वासन पुर्ण झालं का? आता तर प्रत्येक भाषणात हा माणूस जनतेला दिलेल्या आश्वासनावर एक चकार शब्द काढायला तयार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला फसविले आहे. आता त्यांना घरी बसवण्याची वेळ आलीय, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

मावळ लोकसभेचे काॅंग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित काळेवाडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार प्रकाश गंभिजे, सुषमा अंधारे, सलक्षणा सलगर आदींनी मान्यवर उपस्थित होते.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, लोकसभेचे मतदान करताना चुकलो की संपुर्ण देशाचे वाटोळं होतं, मतदारांनो विचारपुर्वक मतदान करा,  मागील निवडणुकीत भाजपाने छत्रपतीं शिवाजी महाराजाचे आणि डाॅ. बाबासाहेंब आंबेडकराचे स्मारकांचे काय झालं, त्या स्मारकाला अजून एक वीट बसविली नाही. मोदींनी केलेल्या योजनांचे काय झालं, उज्जवला योजनेचा, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियातून देशाला काय फायदा हे सांगायला हवं, त्यावर न बोलता केवळ शरद पवार साहेबावर मोदी टीका करत आहे.

भाजपचे खासदार बोलतात की, पुन्हा भाजपची सत्ता आली तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाही. आपल्याला नोटाबंदी करताना मोदींनी विचारला होतं का? त्यावरुन एक दिवस मोदी टीव्हीसमोर येवून मित्रो, यापुढे देशात निवडणूका होणार नाही, असं ते सांगतील, त्यामुळे आपले संविधान, लोकशाही धोक्यात असून भाजपला देशात हूकूमशाही आणायचे आहे.

शिवसेनेची सत्ता असूनही खासदार श्रीरंग बारणे काय विकास केला. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केवळ शरद पवार, अजित पवार यांनी केला आहे. त्याप्रमाणे मावळचा विकास पार्थ पवार करतील, असा विश्वास मी तुम्हाला देतो. उलट शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान आवास योजनेची निविदा रद्द करावी, म्हणून नगरविकास मंत्र्याना निवेदन दिले, त्यामुळे गोरगरीबांची घरे मिळू नयेत, असा प्रयत्न या खासदारांनी केले आहेत. असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button