breaking-newsमनोरंजन

बाळू म्हणजेच समर्थला झाले अश्रू अनावर …

कलर्स मराठीवरील अस्सल ‘पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये कलर्स मराठवरील लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलंमधील कलाकारांनी हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे लाडके कलाकार अभिनेता स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेदेखील यावेळी मंचावर उपस्थित राहणार आहेत.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या भागात बाळुमामाची टीम आणि मुक्ता,स्वप्नील त्यांच्या जीवनातील काही रंजक किस्से यावेळी सांगणार आहेत. बाळुमामाची भूमिका करणारा बालकलाकार समर्थ या मालिकेविषयी सांगताना अचानक गहिवरला आणि त्याच्या डोळ्यात अश्रु तरळले. तर सत्यवाची भूमिका साकारणाऱ्या साजरीचा मालिकेच्या सेटवर ‘गधाभाई’ फेव्हरेट आहे. हा गधाभाई नक्की कोण हेदेखील यावेळी समोर येणार आहे.

दरम्यान, स्वप्नील जोशीने त्याचा रामानंद सागर यांच्याबरोबचा किस्सा सांगितला. त्याची या क्षेत्रामध्ये कशीएन्ट्री झाली हे देखील त्याने या भागात सांगितलं. तर मुक्ता आणि स्वप्नील यांनी अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर तसेच सतीश राजवाडे यांच्याबद्दल एक आवडणारी आणि एक खटकणारी गोष्ट देखील सांगितली. आता हे किस्से आणि गोष्टी काय आहेत हे तुम्हाला या आठवड्यामध्ये कळणार आहे . तेव्हा बघायला विसरू नका ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’चा हा विशेष भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button